Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून नवीन 52 विहिरींना मंजुरी

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबवून थेट सामान्यांपर्यंत लाभ पोहोचवली जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत 52 नवीन विहिरींचे खोदकाम करण्यास आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे. या नवीन 52 विहिरींची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच कामे सुरू होणार आहे.बीड विधानसभा क्षेत्रात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शखाली शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचविला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड तालुक्यातील 52 गावामधील 52 नवीन विहिरींच्या खोदकामास परवानगी मिळाली आहे. या ठिकाणी वीज जोडणी आकार शुल्क भरण्यासाठी पुर्व सहमती देखिल देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून या 52 गावात नवीन 52 विहिरी मंजुर झाल्याबद्दल व त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केल्याबद्दल त्यांचे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांकडून आभार मानले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा