Subscribe Us

header ads

शहंशाहवली दर्गा जमीन घोटाळा प्रकरणी; उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटीलसह पंधरा जणांवर गुन्हे दाखल

बीड स्पीड न्यूज 

बीड_ जिल्ह्यामध्ये दर्गा मस्जिद देवस्थान आदी ठिकाणच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहे. या पूर्वी आष्टी तालुक्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बीड शहरातील गावली दम्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये काहनी बनावट दस्ताऐवज तयार करून तलाठी मंडळ अधिकारी, महसूल प्रशासन अधिकारी यांना हाताशी धरून गैरव्यवहार केल्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी आघाव तत्कालीन बौड तहसीलदार तलाठीसह जवळपास १५ जणांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास ७९६ एकर ३७ गुठे जमीन आहे. परंतु काहीनी सातबारा व फेरफार बदलून नावे लावून जमिन बळकावली आणि काहींना विकली या सोबतच महामार्गामध्ये जमीन गेली. शासनाचे १५ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात दान निधी मध्ये जमा असताना सदर जमीन लाटण्याच्या उद्देशाने व ते पैसे हृदय करण्याच्या बनावट दस्ताऐवज शासनाची आणि फोडांची फसवणूक केली. उपजिल्हाधिकारी प्रकाश आ यानी यातील आरोपी हबीबोद्दीन यांच्याशी संगनमत करून मु.त.क्र.४७४४ आधारे  दर्गेची ईनामी जमीन सर्वे
नं.२३.३१,३२,८८,८९ मधून  दर्ग्याच्या नावाची नोंद कमी करून हबीवोदोद्दीन व इतरांनी  त्यांच्या नावाची नोंद केली सर्वे नं. २२ व ९५ मधील १० एकर जमीन  शेख अश्फाक,  सय्यद अजमततुल्ला, अजिज कुरेशी, शेख मुजाहीद यांनी एक कोटी ३० लाख रुपयांमध्ये खरेदी खताच्या आधारे बेकायदेशीर ईतरांना विक्री केली म्हणून अमिनो जमा, खलीर जमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हबीबोद्दीन सिद्धीकी,  रईस उद्दीन सिध्दीकी, कलिमोदीन सिद्दीकी, सलीमोदीन सिध्दीकी, अशफाक गौस, अजमतुल्ला सय्यद, अजिज उस्मान कुरेशी, मुजाहीद मुजीब शेख, उपजिल्हाधिकारी मुसुधार प्रकाश आघाव पाटील, महसुल सहायक खोड, महसूल सहायक मंडलिक, पौ.क. राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे, . एस. आंधळे, तत्कालीन तहसीलदार व अभिलेखक विभागातील महसूल अधिकारी यांच्यावर कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८,४१७,३४ वफ अधिनियम १६५४ कलम ५२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा