Subscribe Us

header ads

पिंपळनेर हद्दीत भर दुपारी दोन ठिकाणी चोरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

 पिंपळनेर हद्दीत भर दुपारी दोन ठिकाणी चोरी 



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ब्रह्मगाव आणि मौज या दोन गावात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे.पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मगाव या गावात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत (१)बबन ज्ञानोबा  घोरड (२)बाबासाहेब रघुनाथ डावकर (३) बळीराम भाऊसाहेब घोरड आणि (४) विलास राधाकीसन घोरड सर्वांच्या घराचे कुलूप 

तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातली रोख रखमेसह सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे.तसेच दुसरी घटना मौज या गावात घडली व्यंकट सर्जेराव थोरात यांच्या घरातील रोख ५०.००० रुपये आणि  सोने चोरून चोरट्याने याच गावातील सोजरबाई अशोक थोरात यांच्या घरातील रोख रखमेसह  सोने चोरून चोरट्याने घरातली समान अस्तव्यस्त फेकुन चोरट्याने पोबारा केला या दोन्ही घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडल्या 

आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय आघाव. पीएसआय ढाकणे. आणि एएसआय गर्जे  यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस करत आहेत. दिवसा दुपारी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा