Subscribe Us

header ads

वृध्द पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृणपणे केली हत्या!

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज पहाटे वृध्द पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे.या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संजिवनी पिराजी शेजूळ ( वय ६० वर्ष ) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.गेवराई तालुक्यातील खांडवी येथे पिराजी शेजूळ (वय ६५ वर्षे) याने संजिवनी यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून आपल्या पत्नीची हत्या केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. तर आरोपी पिराजी शेजूळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपी पिराजी शेजूळ हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.हि हत्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा