Subscribe Us

header ads

चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

 चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

गेवराई_ चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे गुरुवार रोजी रात्री घडली असून सरत्या वर्षाच्या सकाळी शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता हि घटना उघडकीस आली. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर ९३ मधील फिसके नामक शेतकऱ्याच्या विहिरीत उडी घेऊन आपल्या चार मुलांसह ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असून मृतांत एक मुलगा तीन मुलींचा समावेश आहे.या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विहीरितून मृतदेह बाहेर काढले. तसेच पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.मृता मध्ये गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी ( वय ३० वर्ष), भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय १२ वर्ष), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय १० वर्ष), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय ८ वर्ष), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय ६ वर्ष), असे या मृतांचे नावे आहेत.दरम्यान या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा