Subscribe Us

header ads

मंडळ अधिकाऱ्याकडून लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी कुंभार जाळ्यात

बीड स्पीड न्यूज 


माजलगाव_मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले.येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने तहसील कार्यालयात दिली होती.याची चौकशी पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांच्याकडे होती. या प्रकरणात नरवडे याने पैशाची मागणी केली व त्यात मध्यस्थी कुंभार यांनी केली, शुक्रवारी दुपारी एक च्या दरम्यान कुंभार यांच्या राहत्या घरी एक लाख रुपयांची मागणी केली होती ती  रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा