Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना दणका; सेवा सोसायटी पालवण ‘अ’ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे अख्खे पॅनल विजयी

बीड स्पीड न्यूज 

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना दणका;सेवा सोसायटी पालवण ‘अ’ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे अख्खे पॅनल विजयी


बीड (प्रतिनिधी):- तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या सेवा सहकारी संस्था पालवण ‘अ’ च्या निवडणूकीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना जबर दणका दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत हे अख्खे पॅनल विजयी झाले असून या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के पोलींग एजंटप्रमाणे ठाण मांडून होते. परंतू त्यांच्या गावातील मतदारांनी त्यांना धुळ चारली आहे.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पालवण गावची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पालवण ‘अ’ ची निवडणूक शुक्रवार दि.३१ डिसेंबर २०२१ पार पडली. या निवडणूकीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत नगद नारायण शेतकरी विकास पॅनल आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे खंदे समर्थक सुभाष मस्के व इतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना भारी ठरले आहेत. यात दौंड बाबासाहेब दशरथ, मस्के कांता आश्रुबा, मस्के दादासाहेब बाबुराव, मस्के बाबुराव शेकू, मस्के भगवान राजेभाऊ, मस्के सुरेश धोंडीराम, सातपुते मदन रामराव, मस्के सुभद्राबाई आश्रुबा, मोटे शांताबाई दगडू यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणूकीत विजय झालेल्या उमेदवारांचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून या निवडणूकीत साथ देणार्‍या मतदारांचे देखील आभार मानले आहेत. या निवडणूकीत विजय झाल्यानंतर सुभाष मस्के यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा