Subscribe Us

header ads

सलीम जहाँगीर यांच्यासह 700 नागरिकांचे लसीकरण


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेख यांनी शिबिराचे कौतुक करून लस घेण्याचे केले आवाहन

बीड (प्रतिनिधी):- माजी सभापती सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी आयोजित दोन दिवसीय कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा समारोप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासट यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी स्वत: सलीम जहाँगीर यांनी शिबीरातच लसीचा डोस घेतला. दोन दिवसीय शिबीरास 700 पेक्षा अधिक नागरीकांचे लसीकरण झाले.बीड येथील माजी सभापती सलीम जहाँगीर यांच्या 

निवासस्थानी दोन दिवस कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. यामध्ये 700 पेक्षा अधिक नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. समारोप प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रोैफ शेख यांनी सलीम जहाँगीर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उर्वरित नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन यावेळी डॉ. शेख यांनी केले. यावेळी डॉ.आर.आर.हाश्मी, सिस्टर डी.एल.भालेकर,व्ही.एस.नेहरकर, आशा वर्कस् प्राचीताई उगले, हलीमा ताई शेख, संगीताताई कदम, मोहिनीताई जोशी, ललीताताई अडाणे , नूरलाला खान,  युवानेते रियाज सिद्दीकी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा