Subscribe Us

header ads

पसायदानचे गोवर्धन दराडे यांना सेवा गौरव पुरस्कार मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

बीड स्पीड न्यूज 

बीड, प्रतिनिधी : पन्नासहुन अधिक वंचीत, अनाथ मुलांचे पालन- पोषण आणि संगोपन करणारे पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे यांना मराठवाडा लोकविकास मंचने अनाथ सेवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. गोवर्धन दराडे हे मागील एक तपापासून पसायदान सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून वंचीत बलकांची सेवा करत आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले सर्व स्तरातील मान्यवरांकडून गोवर्धन दराडे यांच्यावर अभीनंदनाचा वर्षाव होत आहे.अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आणि बालाघाटाच्या डोंगर रांगेत दुर्गम भागात वसलेल्या गावातून पुढे आलेल्या गोवर्धन दराडे यांनी स्वत:ची शेती, घर विकून अनाथ- वंचीत मुलांसाठी पसायदान सेवा प्रकल्प उभा केला. शासनाची कसलीही मदत नसताना गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून ते पसायदान सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून वंचीत, निराधार, अनाथ बालकांचे पालन, पोषण आणि संगोपन करत आहेत. कोरोना महामारीच्या कठीण काळात देखील गोवर्धन दराडे यांनी आपले सेवा कार्य थांबवले नाही. आज ढेकणमोहा येथे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या पसायदा सेवा प्रकल्पात 14 मुली आणि 40 मुले आहेत. या प्रकल्पात लहानाचे मोठे झालेले अनेक मुले चांगले शिक्षण घेऊन यशस्वी देखील झाले आहेत. दराडे यांच्या या सेवा कार्याची दखल घेत मराठवाडा लोकविकास मंचने  गोवर्धन दराडे यांना अनाथ सेवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. एक तपाहून अधिक काळापासून सेवा करणार्‍या गोवर्धन दराडे यांना अनाथ सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा