Subscribe Us

header ads

सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी कोविड लसीकरण शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- माजी सभापती तथा नगरसेवक सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी बुधवारी पहिल्या दिवशी झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीरात नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. सदरील लसीकरण मोहिम  दि.2 डिसेंबर रोजी सुरू राहणार असल्याचे सलीम जहाँगीर यांनी सांगितले.पेठ बीड भागातील गजाजन नगर, इदगाह रोड येथे माजी सभापती सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी बुधवारी 

सकाळपासुनच कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीरास सुरूवात करण्यात आली. पेठ बीड भागातील नागरीकांनी स्वत: सहभाग नोंदवुन लसीकरण करून घेतले यावेळी
 डॉ आर आर हास्मी साहेब,सिस्टर भालेकर डी एल मॅडम, नेहरकर वि एस, मॅडम, आशा वर्कर प्राचीताई उगले ,हलिमा ताई शेख, संगीता ताई कदम, मोहिनी ताई जोशी, ललिता ताई आडाणे, युवा नेते रियाज भाई सिद्दिकी,यांनी सहकार्य केले उद्या दि.2 डिसेंबर सकाळी 9 ते 2 व सायं.5 ते 10 यावेळेतही लसीकरण सुरू राहणार असुन नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा