Subscribe Us

header ads

परळी पोलीस ठाण्यास ताबडतोब महिला पोलिस अधिकारी द्या - संभाजी ब्रिगेडची मागणी

बीड स्पीड न्यूज 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे ग्रामीण, संभाजीनगर व शहर असे तिन पोलीस ठाणे आहेत. परंतु या तिन पोलीस ठाण्यात एकही महिला पोलिस अधिकारी नसल्याने या तिन्ही पोलीस ठाण्यांना महिलांबाबत च्या केसेस संदर्भात अडचणीचा सामना करावा लागतो आहे.तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांची १ ऑक्टोबर २०२० ला परळी येथून बदली झाली. तेव्हा पासून महिला पोलिस अधिकाऱ्याची उणीव निर्माण झाली आहे. महिलांच्या बाबतीत असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातील कामकाजामध्ये प्रसंगी बाहेरील ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांचा आधार घ्यावा लागतो.या परिस्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून तपास कामी पारदर्शकता व दिरंगाई नाकारता येत नाही.शहरातील तसेच तालुक्यातील महिला / मुलींच्या समस्या तसेच सुरक्षेच्या कामी तिन्ही पोलीस ठाण्या पैकी एका तरी ठाण्यात महिला पोलिस अधिकारी असण्याची अत्यंत गरज आहे.परळी पोलीस ठाण्यास ताबडतोब महिला पोलिस अधिकारी देण्याची व्यवस्था करण्यात यावी" अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व शहराध्यक्ष सेवकराम जाधव यांनी पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा