Subscribe Us

header ads

माळीवेस चौक ते आंबेडकर पुतळा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावा...

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

प्रतिनिधी : बीड शहरात मा. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर साहेबांनी विकास गंगा आणून बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. शिवाजी पुतळा ते बशीर गंज, बलभीम चौक ते माळीवेस, माळवेस चौक ते सावता माळी चौक, नगर नाका ते तुळजाई चौक , अंबिका चौक ते नगर नाका अशी रस्त्याची कामे केली. मात्र माळवेस चौक ते आंबेडकर पुतळा या रस्त्याचे रुंदीकरण चे काम राहून गेले. बीड शहराच्या विकास आराखड्यात या रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित होते. हे काम नगराध्यक्षांच्या या कारकिर्दीत पूर्णत्वास जावे अशी अपेक्षा 

नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  हा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी नेहमीच  वाहनधारकांना ट्रॅफिक जाम चा अनुभव घ्यावा लागतो. हा रस्ता जुने बीड आणि नवीन बीड यांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते.बऱ्याच वेळा तासनतास ट्रॅफिक जाम होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्ता अरुंद असल्याने  व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरी या प्रस्तावित मार्गाचे रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा