Subscribe Us

header ads

गेवराईत जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई ; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी मात्र फरार;अप्पर पोलिस अधिक्षक लांजेवार यांच्या पथकाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका राजकीय पदाधिकारी  जुगारअड्ड्यावर छापा टाकून सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई बेलगाव (ता.गेवराई) येथे करण्यात आली. दरम्यान,छाप्यानंतर शेडच्या तीन दरवाजांतून जुगाऱ्रूांनी ऊसाच्या शेतात धूम ठोकली. त्यामुळे एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.बेलगाव (ता.गेवराई) येथे रवी पवार याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राजरोस जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना मिळाली होती. रवी पवारच्या शेताील हा जुगारअड्डा एका राजकीय इशाऱ्यावर सुरु होता, अशी माहिती आहे.अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सहायक निरीक्षक शामकुमार डोंगरे, हवालदार गजानन ठेंगळ, पो.ना.पांडुरंग काचगुंडे, सूरज काकडे, अलताफ शेख व राखीव दलाच्या जवानांना सोबत घेऊन ८ रोजी रात्री साडेदहा वाजता 

छापा टाकला. याप्रकरणी हवालदार गजानन ठेंगळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात १५ जणांवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी गाद्या. सतरंज्या. काही मोबाइल, एक जीप, तीन कार, १० दुचाकी, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.पत्र्याच्या शेडला चोहोबाजूने दरवाजे आहेत. मुख्य दरवाजातून पोलीस कारवाईसाठी आत शिरले तरी तातडीने पळून जाता यावे, यासाठी शेडला चोहोबाजूने दरवाजांची सोय केलेली आहे. पोलीस शेडमध्ये शिरताच तीन दरवाजांतून जुगार  खेळणारे बाहेर पडून अंधाराचा फायदा घेत ऊसाच्या शेतातून पोबारा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा