Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी साठी एसआयटी स्थापन

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बहुचर्चित देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात दाखल झालेल्या दोन गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत हे तपास अधिकारी म्हणून काम करणार आहेत. पंकज कुमावत यांच्या कारभाराची पद्धत आणि घोटाळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचे घोटाळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्यात देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. देवस्थान जमीन घोटाळ्यांमध्ये काही राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या पार्शवभूमीवर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी एसआयटी स्थापन केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक आर.ए.शेख हे या समितीत असणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा