Subscribe Us

header ads

बीडमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ, दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा; तिसऱ्या ठिकाणी दगडफेक

बीड स्पीड न्यूज 

बीड_ नेकनूर परिसरात दरोडेखोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. तर तिसऱ्या ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या ठिकाणी जेव्हा दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिसरातील नागरीक सतर्क झाले. त्यामुळे त्यांना तिथून धूम ठोकावी लागली. मात्र त्यावेळी दरोडेखोरांनी अंधाधूद दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरातील नारिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरोडेखोरांकडे शस्त्र होती. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत दोन जणांना लुबाडलं. यावेळी त्यांनी तीन जणांना प्रचंड मारहाणही केली. आरोपींनी पीडित नागरिकांचे सोने-चांदीचे ऐवज लंपास केले आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या सुलतानपुर येथील अशोक दगडू नाईकवाडे यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांना दरोडेखोरांनी गजाने मारहाण केली. या मारहाणीत नाईकवाडे यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. दरोडेखोरांनी त्यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने पळवून नेले. त्यानंतर दरोडेखोरांनी सफेपूर येथे धुमाकूळ घातला. सफेपूरचे रामभाऊ किसन घोडके, गोरख रामभाऊ घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले.दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांची हिंमत एवढी वाढली की, त्यांनी थेट नेकनूर येथे माजी सरपंच शेख आझम पाशा, पांडुरंग होमकर यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. शेख आझम पाशा यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील इतर नागरिकांना चोर आल्याचं समजलं होतं. त्यामुळे ते सतर्क झाले. त्यांनी तातडीने नेकनूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पण त्याचा सुगावा कदाचित दरोडेखोरांना लागला. नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच ते पसार झाले. पण दरोडेखोरांनी तिथून पळून जाण्याआधी दगडफेक केल्याची माहिती समोर आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा ते चोर तिथे नव्हते.दरम्यान, दुसऱ्यादिवशी पहाटे दरोडेखोरांनी मध्यरात्री प्रचंड धुमाकूळ घातल्याचं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी दरोडेखोरांनी हैदोस घातला होता त्या दोन्ही ठिकाणचे पीडित नागरीक नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आले. त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसाना सांगितला. त्यानंतर पोलिसांना सर्व प्रकार समजला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा