Subscribe Us

header ads

काँग्रेस कार्यकर्ता समीर खून प्रकरणी तिघांना अटक

बीड स्पीड न्यूज 

पुणे_ काँग्रेसचा कार्यकर्ता  आणि बांधकाम व्यावसायिक समीर हुसेन मनूर याचा खून  केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक  केली. आर्थिक वादातून त्यांनी समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनूर (वय ३२, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.मेहबुब सैफान बलुरंगी (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी समीर याचे वडिल हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.समीर हा पूर्वी जनता वसाहत येथे रहायला होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत करावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वादावादी झाली होती. या आर्थिक व्यवहारावरुन मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट रचला.समीर हा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर ६ गोळ्या झाडल्या.डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला.त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.भारती विद्यापीठ पोलिसांनी  याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा