Subscribe Us

header ads

लोकनेते मा. ना .जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

बीड स्पीड न्यूज 

तेलगाव प्रतिनिधी  : सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव आणि कला विज्ञान महाविद्यालय तेलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते मा.ना.श्री.जयदत्त आण्णा क्षिरसागर साहेब (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा 71 वा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन संपन्न झाला. शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष मा.श्री. अशोक भाऊ लगड ,मा. श्री. विठ्ठल दादा लगड ,सरपंच मा. श्री. दिपक लगड ,मा. श्री. बाबुराव धुमाळ मा.श्री. राउत साहेब प्राचार्य शिंदे सर , प्र.प्राचार्य डॉ .कांबळे सर आणि जीवनदायी ब्लड सेंटरच्या डॉ. शिंदे मॅडम ,आघाव सर आदि मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य श्री. शिंदे वसंत सर यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले. महाविद्यालयाच्या वतीने वेळोवेळी असे समाज उपयोगी उपक्रम घेणार असल्याचे प्रतिपादन केले. मा.ना.श्री.अण्णा साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मा.अशोक भाऊ लगड यांनी मा. ना. जयदत्त आण्णा क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. शाळा आणि महाविद्यालया च्या वतीने आयोजित समाज उपयोगी रक्तदान शिबिराचे कौतुक केले .मा.श्री. विठ्ठल दादा लगड यांनीही वाढदिवसानिमित्त मा. नामदार जयदत्त आण्णा क्षीरसागर यांना दीर्घायुष्य लाभो अशी जगदंबे चरणी प्रार्थना केली. तेलगाव आणि परिसराच्या विकासात 

स्वर्गीय काकू आणि मा. अण्णासाहेब यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे प्रतिपादन केले या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्राध्यापक व गावातील युवकांनी ही सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे सर्व शिक्षक व प्राध्यापक तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शेख ताजुद्दीन यांनी केले तर आभार श्री. चवार सर यांनी मानले. यावेळी शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा