Subscribe Us

header ads

ओबीसी आरक्षण प्रश्नी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/ दि.०७ महाराष्ट्रात दोन निवडणूक न घेता सध्या सुरू असलेल्या ,,१०५ नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करावा आणि नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून एकच निवडणूक घेण्यात यावी या मागणी साठी निदर्शने व निवेदन  जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले.याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगेतसेच जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,डॉ.नितीन सोनवणे, बबनराव वाडमारे,संतोष जोगदंड दगडू गायकवाड,युनूस शेख,पुष्पाताई तुरूकमाने,बालाजी जगतकर,डॉ.गणेश खेमाडे,किरण वाघमारे, बीड वंचित बहुजन आघाडी ची मागणी ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मिळाल्याशिवाय राजकीय आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे महाराष्ट्रातील ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चिघळवला असून ओबीसी आरक्षण संपवणे हेच सत्तेत बसलेल्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार पक्षांचे धोरण असल्याचे दिसून येते. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाचा तीव्र निषेध करीत आहोत. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या शिवाय न्यायालयाला अपेक्षीत इम्पीरिकल डेटा मिळणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहोत. राज्य शासनाने ओबीसींच्या मतावर डोळा ठेऊन ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचे नाटक केले आणि केंद्रातील भाजपने पूर्वीचा जाती निहाय जनगणनेचा डेटा देण्यास आणि नवीन जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिल्याने या सर्व पक्षांची ओबीसी विरोधी भूमिका स्पष्ट झाली आहे. आम्ही या सर्व पक्षांचा निषेध करत या निदर्शने सहभागी पदाधीकारी गणेश वीर श्रीकांत वाघमारे, चेतन पवार, संदीप जाधव ,आकाश साबळे, ऋषिकेश वाघमारे, गोपीनाथ कानडे, आकाश जावळे, ऋषिकेश वाघमारे, गोपीनाथ कारंडे आकाश गवळी, अजय साबळे, आकाश जावळे, बाळासाहेब मुळीक ,मुबारक पठाण, पोपट नाकाडे, महादेव नाकाडे, सुनील धोत्रे, आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा