Subscribe Us

header ads

गौरव दिनानिमित्त मुंबई येथे बंजारा एकता मेळावा चलो गोर राज सत्ता की ओर

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी / महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांनी 5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली.तो दिवस राज्यातील बंजारा, भटके विमुक्त, बहुजन समाज सत्ता संपादन- स्वाभिमानी तथा गौरव दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहीनुर हिरा,आंतरराष्ट्रीय किर्तीचे कृषीतज्ञ म्हणून नाईक साहेबांचा सन्मान केला जातो. नाईक साहेब सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास बारा वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. त्यांचा रेकार्ड आजतागायत कोणीही मोडु शकलं नाही.या गौरव दिनाचे औचित्य साधून ज्ञानपीठ लोधीवली मुंबई येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने बंजारा एकता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात कोरोणा काळात रूग्णांना मदत करणारे डॉक्टर व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्यागी व समर्पित कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता. या मेळाव्यातून राज्यातील बंजारा समाजाला " चलो गोर राज सत्ता की ओर" हा संदेश देण्यात आला.गोरपीठावर देशातील बंजारा समाजाचे दानशूर नेते,प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.किसनभाऊ राठोड, बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हिजेएनटी 

सेलचे अध्यक्ष हिरालाल भाऊ राठोड, राष्ट्रीय प्रवक्ते मधूकर जाठोत,प्रदेश उपाध्यक्ष नवनाथभाऊ चव्हाण, प्रवक्ते गोर प्रकाश राठोड,कांता महाराज, हिंगोली जिल्हा अध्यक्ष बाबुलाल पवार इत्यादी नेते उपस्थिती होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला देवीदेवतांची पुजा करुन भोग लावण्यात आला. मुंबई मेगा सिटीत सेवा बजावणारे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गोर धर्म चे ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब या तीन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .मागील दोन वर्षापासून कोरोना काळात जनतेला अहोरात्र मदत करणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवा सुविधा देणाऱ्या नामवंत डॉक्टरांचा तसेच मान्यवर समाज सेवकांचा राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
डॉ कैलास पवार सिव्हिल सर्जन ठाणे, डॉ दुर्योधन चव्हाण
 असिस्टंट डायरेक्टर हेल्थ सर्विस मुंबई, डॉ राम चव्हाण
 डायरेक्टर गुरुकृपा डायगोनिसटीक सेंटर अंधेरी,
*डॉ राजू सिंग राठोड एम.ओ.कोवीड मुंबई-१९, 
डॉ सुरेश आडे अध्यक्ष 
 नॅशनल सेवा डॉ. असोसिएशन मुंबई,
डॉ कांचन आडे
 नॅशनल सेवा डॉ. असोसिएशन नवी मुंबई,
डॉ मधुकर राठोड 
नॅशनल सेवा डॉक्टर असोसिएशन नवी मुंबई , धर्मा भाऊ राठोड ज्येष्ठ सनदी अधिकारी मुंबई महानगरपालिका,बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण, हिरालाल राठोड प्रदेशाध्यक्ष व्हि. जे.एन.टी सेल राष्ट्रवादी पक्ष, राजेश चव्हाण जालनेकर वसंत विचारधारा मुंबई,वसंत राठोड संघटक राष्ट्रीय बंजारा परिषद,  उद्धव पवार सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष रायगड जिल्हा, देवीदास जाधव सामाजिक कार्यकर्ते नवी मुंबई ,तसेच सतीश राठोड सामाजिक कार्यकर्ते नवी मुंबई  यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा पी.टी.चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक साहित्यिक व राजकीय विषयांवर आक्रमक भूमिका मांडत, बंजारा समाजाला विकासापासून वंचित ठेवणार्या आघाडी सरकारवर चौफेर हल्ला बोल केला. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आणि त्यांनी सुरू केलेल्या योजना,कायदेविषयक माहिती दिली.सरकार नाईक साहेबांनी सुरू केलेल्या एकेक योजना बंद पाडत असुन,नाईक साहेबांनी सुजलाम सुफलाम केलेल्या महाराष्ट्रातच त्यांची वारंवार उपेक्षा केली जाते.हि पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.यामुळे बंजारा समाजात रोष व्यक्त होत आहे.विवध राजकीय पक्षांनी लोकसंख्येच्या प्रमाणात बंजारा समाजाला सत्तेत भागीदारी द्यावी, अन्यथा येणार्या काळात बंजारा समाज गोर धर्माच्या पांढ-या झेंड्याखाली व दानशूर नेते प्रसिद्ध उद्योगपती आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन सरकारला व पक्ष प्रमुखाला त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला. म्हनूनच चलो गोर राज सत्ता की ओर  हा नारा दिला आहे. सदर कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित मंडळी, महिला युवक विद्यार्थी पत्रकार बांधव राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी गोर धर्मप्रचारक तसेच हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा