Subscribe Us

header ads

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यासोबत विधवा प्रश्नावर महत्वाची मिटींग संपन्न :- बाजीराव ढाकणे

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी महिला आयोग सर्वोतोपरी मदत करणार असे आश्वासन आयोगाच्या नूतन अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सोमवार दि ०६ डिसेंबर २०२१ रोजी कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य च्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या ऑनलाईन मिंटींगमध्ये दिले.  राज्यातील विधवा प्रश्नावर तुम्ही एकदा मीटिंग घ्यावी अशी विनंती कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब दादा कुलकर्णी यांनी रुपालीताई चाकणकर यांना केली आणि त्यांनी तातडीने ऑनलाईन पद्धतीने मिटींग घेण्यासंदर्भात नियोजन केले. या कामी त्यांचे जनसंपर्क अधिकारी शंभूराजे यांनी खुप सहकार्य केले. या जलद प्रतिसादाने हजारो विधवा भगिनींना न्याय मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. रुपालीताई सोबतच्या ऑनलाईन मिटींगमध्ये राज्यातील आमच्या  सर्व प्रमुख  ६५ कार्यकर्त्यांसोबत दीड तास रुपालीताई चाकणकर यांनी मिटिंग घेऊन सर्व अडचणी संदर्भात माहिती जाणून घेतली आणि त्यावर तातडीने उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन दिले आहे असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.
 
आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न मुद्दे ऐकून घेऊन त्याबाबत सर्व प्रमुख मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला जाईल व संबंधित मंत्री आणि खात्यासोबत कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येतील असे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
 त्यांचा कामाचा वेग आणि प्रतिसाद अत्यंत आश्वासक आहे.महाराष्ट्रातील कोरोना संसर्गातील एकल महिलांच्या बाबतीत धोरण तयार व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी , विधवांना एक रकमी आर्थिक मदत करणे, विधवांच्या मालमत्तेचा प्रश्‍न, विधवा महिलांच्या कर्ज वसुली बाबत बँकेचा तगादा, खाजगी  हॉस्पिटलने लूट केलेल्या विधवा महिलांना ती रक्कम परत मिळवून देणे असे अनेकविध प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले तर सर्वच प्रश्नांचा पाठपुरावा त्या करणार आहेत असे आश्वासन दिले आहे.मागिल सहा सात महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नावर आम्ही करत असलेल्या प्रयत्नांत महिला आयोगाने या प्रश्नावर सक्रिय होणे ही खूपच महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे रूपालीताई चाकणकर यांचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे. या वेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, तसेच आष्टी तालुका समन्वयक सुरेश गांजुरे , भगवंत पाळवदे , सुरेश राजहंस यांच्या सह राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा