Subscribe Us

header ads

तेच तेच कर्मचारी सतत ठेवणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे नाही का..? मागील निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा या निवडणुकीत सहभाग नसावा- संभाजी ब्रिगेड,एमआयएम,वंचित बहुजन आघाडीची मागणी

बीड स्पीड न्यूज 

परळी (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद ,पोलिस प्रशासन ,निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी हे ठाण मांडून बसलेले आहेत. आशा अधिकारी व कर्मचाऱ्यां मुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहील की नाही याबद्दल शंका असून मागील निवडणुकीत प्रत्येक्षात सहभागी असलेले कर्मचारी व अधिकारी यांचा येणाऱ्या निवडणुकीच्या कामात सहभाग नसावा. अशी संयुक्त मागणी संभाजी ब्रिगेड,एम आय एम, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, परळी वैद्यनाथ यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.परळी नगर परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात व येणारी निवडणूक पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडावी.तेच तेच कर्मचारी सतत ठेवणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे नाही का..? असा सवाल उपस्थित करत संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी एम आय एम च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त औरंगाबाद  व मा. जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे, महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर, एम आय एम तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष संजय भाऊ गवळी, वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष गौतम भाऊ साळवे, वंचित बहुजन आघाडी युवा नेते राजेश भैय्या सरोदे, संभाजी ब्रिगेड तालुका सचिव प्रभाकर सटाले ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा भाई शेख, ज्ञानेश्वर गीते,अवीनाश मुंडे, जालिंदर केदार, सुलेमान मणियार, फेरोज खान, तोहीद शेख, शहेबाज कुरेशी, राधाकिसन लुगडे.यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा