Subscribe Us

header ads

बंजारा समाजाचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवेल-आ.संदिप क्षीरसागर तांड्यावरील विकासाचे प्रश्‍न सोडवण्याची दिली ग्वाही; बीडमध्ये बैठक

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- स्व.काकू-नानापासून बंजारा समाज बांधवांनी आपली साथ आणि आशिर्वाद दिलेले आहेत. यापुढे बंजारा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहिल बंजारा समाज बांधवांच्या सुख,दु:खात सहभागी होवून शहरी आणि ग्रामीण भागातील तांड्यावरील विकासाचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी माझी राहिल. शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून तांड्यांचा विकास करेल, त्यासाठी भरीव निधी देईल अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे. ते बीड येथील गेरसेना व वसंतराव नाईक कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक कर्मचारी 

संघ व गोरसेना यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, आजपर्यंत आपल्याला अनेकांनी आश्‍वासने दिली परंतू त्या आश्‍वासनांची पुर्तता त्यांनी केली नाही. यापुढील काळात बीड शहरात बंजारा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देवू ही जागा पालिकेने उपलब्ध करून दिली नाही तर स्वखर्चाने जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तांड्यावरील विकासाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निवडणूकांच्या काळामध्ये आपली साथ आणि आशिर्वाद हवे आहेत. नगर पालिका 

पुर्ण ताकदीने ताब्यात द्या आपले आशिर्वाद सोबत राहू द्या आपल्या सुख,दु:खात आणि विकास कामे करण्यासाठी मी सदैव तयार राहिल असे प्रतिपादनही त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित बंजारा समाजाचे युवा नेते प्रा.कृष्णा राठोड यांनी केले. त्यांनी अपाल्या प्रस्ताविकामध्ये बंजारा समाजातील विविध प्रश्‍न, त्यांच्या अडचणी व मागण्याचे निवेदन त्यांच्यासमोर मांडले. यावेळी कर्मचारी संघटनेचे सचिव अर्जुन चव्हाण, सुंदर राठोड, बिभीषण राठोड, अरूण पवार, बाळु राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

बीडमध्ये बंजारा भवन उभारण्याची ग्वाही

बीड शहरामध्ये बंजारा भवन उभारण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजातील विविध संघटना व प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. परंतू मागील अनेक वर्षापासून केवळ आश्‍वासना पलीकडे बंजारा समाजाच्या हाती काही मिळाले नाही. अशी खंत व्यक्त करत बंजारा समाजाच्या बीड शहरातील शिष्टमंडळाने बंजारा भवन जागा देवून उभारण्यात यावे अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे केली. यावर आ.संदिप क्षीरसागर यांनी पालिकेकडून आपण जागा मिळून घेवू, जर पालिकेने जागा दिली नाही तर बंजारा समाजाच्या बंजारा भवनसाठी मी स्वखर्चाने जागा खरेदी करून देईल आणि बंजारा भवन बांधण्यासाठी लागणारा आवश्यक निधीही देईल अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर शिष्ट मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा