Subscribe Us

header ads

घाटनांदूर येथे भव्य शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात

बीड स्पीड न्यूज 

घाटनांदूर_घाटनांदूर येथील श्री माहेश्वरी बालाजी मंदीरात दि ५ रविवार पासून भव्य दिव्य अशा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात झाली असून कथा निरूपन प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा करीत आहे .
मानवी जिवनाला अमुल्य असे मार्गदर्शन करणारी व आयुष्यात भक्ती,निती,न्याय कशा प्रकारे अंगीकारावी याचे मार्गदर्शन असलेली श्रीमद् भागवत कथा सुरू झाली आहे . कोविड नियमाचे पालन करीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे .तत्पूर्वी सकाळी दहा वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात आली . भव्य सजवलेल्या रथात  प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा,श्री ग्रंथ, पुढे कलशधारी  महीला, वारकरी 

टाळकरी,विणेकरी,मृदंगाचार्य , ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर,अभंग गायण,पाऊली,फुगडी खेळत संपूर्ण शोभा यात्रा श्री हनुमान मंदीर ,श्री बालाजी मंदीर मार्ग ते गणेश पार रोड,श्री सोमेश्वर महाराज मंदीर,श्री विठ्ठल मंदीर मार्गावरून परत माहेश्वरी बालाजी मंदीरात आणण्यात आली . दुपारी १ वाजता कथा प्रारंभ झाली  सदरील श्रीमद् भागवत कथा दररोज दुपारी १ ते ४ पर्यंत चालणार असून कथा समाप्ती दि ११ शनिवार रोजी महाकाला नामसंकीर्तण व महाप्रसादाने  होणार असून या संपूर्ण श्रीमद्  भागवत कथा ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकुमार दरगड,विजयकुमार दरगड व जयप्रकाश दरगड यांनी  केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा