Subscribe Us

header ads

खेळात जय-पराजय होत राहील; पण खेळत राहिले पाहिजे - धनंजय मुंडे यांचा ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना सल्ला

बीड स्पीड न्यूज 

परळी : नामदार प्रीमियर लीगचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

परळीचा श्रीगणेश सुपरकिंग्ज ठरला विजेता तर एम के बॉईज संघ ठरला उपविजेता

परळी (दि. 05) ----- : खेळात कोणी जिंकणार असेल तर कुणालातरी हरावेच लागते, क्रिकेट सारख्या खेळत कोणताच जय-पराजय अंतिम नसतो. जय-पराजय होत राहतील मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून खेळत राहिले पाहिजे, असा सल्ला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील मैदानावर क्रिकेट खेळाडूंना दिला.स्व. पंडित अण्णा मुंडे प्रतिष्ठाण आयोजित नामदार चषक या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ना. मुंडे बोलत होते. येत्या काळात कोविड विषयक नियमांचे पालन करून 

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतील. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खेळांचे प्रचंड कौशल्य आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळाले तर त्यातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात, असे मत ना. मुंडे यांनी व्यक्त केले.दरम्यान विजेत्या श्री गणेश सुपरकिंग्ज या संघाला 77,777 रुपये रोख व ट्रॉफी तर उपविजेत्या एम के बॉईज संघाला 44,777 रुपये रोख व ट्रॉफी, त्याचबरोबर निसार शेख यास बेस्ट बॅट्समन व सुधीर शिंदे यास बेस्ट बॉलर चा खिताब ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात 

आले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद गटनेते अजयजी मुंडे, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, नगरसेवक संजय फड, राजाभाऊ पाळवदे, स्व. पंडित अण्णा मुंडे प्रतिष्ठाणचे सुशील दादा कराड, डॉ. मनोज मुंडे, बाबा होळंबे, सुरेश गित्ते, योगेश सूर्यवंशी, किशोर दंदे, धनराज गुट्टे, नितीन केंद्रे, यांसह आदी मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा