Subscribe Us

header ads

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी उपायप्रा.संगीता मुंडे यांचे प्रतिपादन; माऊली नर्सिंग कॉलेजच्या वतीने लसीकरण शिबीर

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_कोरोनाची दाहकता आपण सर्वांनीच अनुभवली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे बहुतांश नागरिक कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले आहेत. भविष्यात हे संकट पुन्हा उद्भवू नये याकरिता लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे कोरोनाल रोखता येऊ शकते, ही बाब लक्षात घेवून सर्वांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रा.संगीता मुंडे मॅडम यांनी केले.शहरातील धानोरा रोड भागातील माऊली नर्सिंग कॉलेज, श्री भगवानबाबा सेवाभावी संस्था यांच्या वतीने स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रा.मुंडे मॅडम बोलत होत्या. कार्यक्रमास नगरसेवक रंजित बनसोडे, नगरसेवक भैय्या मोरे, प्राचार्या रुपाली पोपळे, कुंभार मॅडम, मेडकर सर, वनवे सर, किरण मॅडम, महादेव हाटवटे, गणैश हौसारे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.मुंडे म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तसाच छोटासा प्रयत्न श्री भगवानबाबा सेवाभावी संस्था व माऊली नर्सिंग कॉलेजच्या वतीने करण्यात आला. धानोरा रोड व परिसरातील घरोघरी जाऊन दोन दिवस सर्वे करण्यात आला. ज्या नागरिकांचा पहिला डोस झालेला नाही तसेच दुसरा डोस राहीला आहे त्यांच्याशी संवाद साधून लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही प्रा.मुंडे मॅडम यांनी केले. यावेळी नगरसेवक रंजित बनसोडे, नगरसेवक भैय्या मोरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्या रुपाली पोपळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महादेव हाटवटे यांनी मानले. लसीकरण शिबीराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा रुग्णालयातील परिचारीका व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी लसीकरण शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा