परळी (प्रतिनिधी): माजी मंत्री तथा रासपाचे संस्थापक अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या फंडातुन देवडा (कन्हेरवाडी ता.परळी ) ते अंबाजोगाई राज्य मार्ग हा बायपास पुर्ण झाले असल्याचे दिसुन आले.शेतकर्यांच्या वाहतुकीसाठी कन्हेरवाडीचे सरपंच तथा मार्केट कमिटीचे संचालक राजेभाऊ फड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून माजीमंत्री रासपाचे संस्थापक अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या आमदार फंडातुन निधी मंजुर करून देवडा (कन्हेरवाडी ता.परळी ) ते अंबाजोगाई राज्य मार्ग हा बायपास रस्ता पुर्ण केला आहे. यामुळे शेतकर्यांना त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. सदरील झालेल्या बायपासची पाहणी आ.महादेव जानकर यांनी केली. यावेळी गावचे सरपंच राजेभाउ फड, जेष्ठ नेते श्रीराम मुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मधुकर गणपत मुंडे व त्यांच्या कुटूंबांयांनी बायपाससाठी जमिन उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.महादेव जानकर व सरपंच राजेभाउ फड यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या