Subscribe Us

header ads

23 कोटींच्या विकास कामातून आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा चौसाळ्याचा गड मजबुत चौसाळकरांचे प्रेम,आशिर्वाद विसरता येणार नाहीत, विकास कामात झुकतं माप देईल-आ.संदिप भैय्या क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- माय-बाप जनता जनार्धनाने अडचणीच्या काळात खंबीर साथ दिली. पहाडासारखी निवडणुक समोर उभी होती. जिवाला जीव देणार्‍या भावासारख्या कार्यकर्त्यांमुळे आणि जनतेच्या आशिर्वादामुळे निवडणुकीत विजय झाला. चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमधील 23 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण होत आहे. खर्‍या अर्थाने गेल्या तीस वर्षाच्या काळातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. चौसाळकरांचे प्रेम, आशिर्वाद विसरता येणार नाही. यापुढेही चौसाळा सर्कलसाठी विकास निधीच्या बाबतीत झुकतं माप दिलं जाईल, येणार्‍या निवडणुकांमध्ये आपली साथ आणि आशिर्वाद कायम राहू द्या, या भागातील रस्ते, वीज महत्त्वाचे सार्वजनिक प्रश्न सर्व मार्गी लावतो अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे. ते चौसाळा सर्कलमील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी रविवार दि.19 डिसेंबर 2021 रोजी चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकास कामाचे भुमीपुजन व लोकार्पण झाल्यानंतर रूईगव्हाण येथे जाहिर सभा झाली. माळरानावरही झालेल्या सभेला चौसाळा सर्कलमधील कार्यकर्त्यांची प्रचंड संख्येने असलेली उपस्थिती आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा चौसाळ्याचा गड मजबुत करणारी आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, वैजीनाथ नाना तांदळे, बबन बापु गवते, महादेव उबाळे, सचिन शेळके, उत्रेश्वर सोनवणे, सुनिल झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड.हेमाताई पिंपळे, भाऊसाहेब डावकर, वनिताताई चाळक, नंदकुमार कुटे यांच्यासह आदींची उपस्थिती 

होती. यावेळी पुढे बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, हा विकास कामांचा पहिला टप्पा आहे. चौसाळा सर्कलने दिलेली लीड त्याच लीडने विकास कामे खेचून आणली आहेत. राजुरीच्या अगोदर चौसाळा सर्कलला विकास कामांचा मान दिला. ही कामे करत असतांना त्याचा दर्जा आणि गुणवत्ता टिकला पाहिजे. या भागात तीस वर्षात जो विकास झाला नाही तो विकास करेल. सार्वजनिक प्रश्न आणि या भागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवेल. येणार्‍या काळात कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण व शहरी भागातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकेल. विरोधक कर्मचारी सोडून 50 लोक जमवू शकत नाहीत परंतू माळरानावरही कार्यकर्त्यांची गर्दी त्यांचे असलेले अफाट प्रेम लढायला आणि संघर्ष करायला बळ देत राहतं. जे-जे शब्द दिले ते शब्द पुर्ण करू, यापुढे विकास कामांना गती येईल असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. तर माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, दळणवळणाची सोय करण्यासाठी आ.संदिप भैय्यांच्या 

माध्यमातून या भागात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला. दूरदृष्टी आणि विकास कामांचा पाठपुरावा करण्याची चिकाटी त्यांच्या अंगी आहे. तीस वर्षातले प्रश्न मोठे आहेत परंतू इच्छा शक्तीच्या बळावर आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या भागाचा विकास ते करतील त्यासाठी संदिप भैय्यांचे हात बळकट करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर अ‍ॅड.डी.बी.बागल म्हणाले की, हा विकास कामांचा सोहळा कार्यकर्त्यांसाठी आनंद देणारा आहे. खर्‍या अर्थाने स्व.काकू-नानांचा वारसा संदिप भैय्या चालवत आहेत. भैय्या पवार साहेबांचे लाडके आमदार आहेत त्यामुळे चौसाळाच काय बीड मतदार संघासाठी कसल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसचे याप्रसंगी 

वैजीनाथ नाना तांदळे, बबन बापु गवते, अ‍ॅड.हेमाताई पिंपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन मुळे व आभार प्रदर्शन प्रदिप काटे यांनी मानले. यावेळी डॉ.बाबु जोगदंड, शिरूबापु डमरे, महावीर ढास, पी.वाय.जोगदंड सर, शिवाजी चव्हाण, उमेश आंधळे, श्रीराम काशिद, अनिल टाके, प्रभाकर मोरे, स्वामी वाणी, धनंजय मुळे, कुर्डले आबा, विलास घरत, काका नाईकवाडे, सुधीर नाईकवाडे, बाळु जोगदंड, पंजाब वाघमारे, श्रीकांत डमरे, संभाजी जोगदंड, धनंजय जोगदंड, सुनिल अनपट, पिनु तावरे, पंडित अरबने, शाम तेलप, सचिन कांबळे, विनोद जाधव आदींनी परिश्रम घेतले.

आ.संदिप भैय्यांचे अंजनवतीकरांनी 33 के.व्ही. मंजुर केल्याबद्दल मानले आभार

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अंजनवती येथील 33 के.व्ही.चा प्रश्न पाठपुरावा करून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी व त्यांच्या यंत्रणेने कसल्याही प्रकारचा याचा गाजावाजा केला नाही. प्रत्यक्ष काम सुरू हेावू द्या, काम पूर्ण करून घेवू अशी भूमिका आ.संदिप भैय्यांनी घेतली.  परंतू आ.संदिप भैय्या तुमच्यामुळेच 33 के.व्ही.चा प्रश्न मार्गी लागला आहे असे म्हणत गावातील ग्रामस्थांनी जाहिर सभेतच आ.संदिप भैय्यांचे आभार मानले.

माळरानावरची अफाट गर्दी भैय्यांना देणार बळ!

चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करत असतांना चौसाळा-वाढवणा या रस्त्यावर रूईगव्हाण या माळरानावर जाहिर सभा आयोजित केली होती. या सभेला दुपार झाली, या दुपारच्या उन्हात चौसाळा सर्कलमधील अफाट गर्दी आ.संदिप भैय्यांचं चौसाळा सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढवणारी ठरली आहे. यागर्दीने आणि आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांमुळे विरोधकांची मात्र झोप उडेल असे दिसते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा