Subscribe Us

header ads

टायर फुटल्याने शिक्षकाच्या गाडीचा अपघात जिज्ञासा अकॅडमीचे संचालक जागीच ठार; चार विद्यार्थी जखमी


 बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील बाभुळखुंटा येथे रात्रीच्या वेळी गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाला आहे. टायर फुटल्याने गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली या अपघातात जिज्ञासा अकॅडमीचे संचालक रविंद्र शेळके हे जखमी होऊन ठार झाले आहेत.रविंद्र शेळके हे पांढऱ्या रंगाची स्कारपिओ घेऊन कार्यक्रमासाठी पुणे येथे गेले होते. ते रात्री मुलांना घेऊन पुण्यावरून बीडला आले होते. मुलांना त्यांच्या गावी काळेगावकडे सोडण्यासाठी निघाले असता. बाभुळखुंटा येथे आले असता गाडी क्र. .MH 03. BH-3742 पांढऱ्या रंगाची स्कारपिओ या गाडीचे टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. यात रविंद्र शेळके गंभीर जखमी झाले आणि त्यातच ते जागीच ठार झाले तर आतील चार विद्यार्थी जखमी झाले.  जखमी विद्यार्थी हे कसेबसे बाहेर आले. आणि त्यांनी शिक्षक शेळके यांना बाहेर काढले मात्र ते मृत झाले होते. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून जखमी विद्यार्थ्यांना लगेच उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले  शिक्षक  शेळके यांचे  मुळ गाव वांगी असून त्यांचे बीड शहरातील नाट्यगृहाजवळ जिज्ञासा अकॅडमी नावाचे कोचिंग क्लासेस आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक