Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांना गती बीड शहरात पावणे दोन कोटींच्या विकास कामांचा फुटला नारळ

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- शहरातील पेठ बीड, शाहुनगर, माने कॉम्प्लेक्स परिसरात व संभाजीनगर भागात अशा एकूण पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून झाला आहे. शहरात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहरात विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळू लागली आहे. या विकास कामांचा शुभारंभ माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.शनिवार दि.18 डिसेंबर 2021 रोजी 

शहरातील विविध प्रभागात 1 कोटी 69 लक्ष रूपयांच्या रस्ता, नाली कामाचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पेठ बीड बुरूड गल्लीमध्ये अतुल कुलकर्णी यांचे घर ते काशीनाथ शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेे. शाहुनगर भागातील प्रभाग क्र.9 बीड येथील पांगरी रोडजवळील तांबोळी यांचे घर ते सय्यद मुसा यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग 

क्र.10 उमाकिरण हॉलजवळील पुजा हुलजुते ते सुरेखा गायकवाड यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये माने कॉम्प्लेक्स ते सुरेशराव काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये अरूण भस्मे यांचे घर ते केसोना गॅस एजन्सी (माने कॉम्प्लेक्स भाग) सिमेंट रस्ता करणे., प्रभाग क्र.13 मध्ये कल्याण सानप ते धसे नर्सिंग यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली 

बांधकाम करणे अशा एकूण पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करतेवेळी वैजीनाथ नाना तांदळे, बबन बापु गवते, सम्राट चव्हाण, शाहेद पटेल, अशोक वाघमारे, बरकत पठाण, अ‍ॅड.इरफान बागवान, अजिंक्य पांडव, अमोल पारवे, पवन तांदळे, राजु महुवाले, सत्यनारायण ढाका यांच्यासह विविध भागातील नागरिकांची व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शहरातील विकास कामे दर्जेदार करून घेणार,
निधीची कमतरता पडु देणार नाही-आ.संदिप भैय्या क्षीरसागर


जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहेत. शहराचा विकास करतांना वारंवार येणार्‍या अडचणी त्यातूनही मार्ग काढत आहे. परंतू गेल्या 25 वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी मात्र कोट्यवधी रूपयांचा निधी येवूनही शहराचा कुठलाच विकास केला नाही. शहरातील विकास कामे दर्जेदार करण्याचा माझा प्रयत्न राहिल. जनतेचं पाठबळ हीच माझी शक्ती असून आपल्या आशिर्वादाने नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा