Subscribe Us

header ads

लोकनेते जयदत्तअण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून शहरात वाहत आहे विकासाची गंगा--- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत नागोबा गल्ली येथील योगेश ताटे यांचे घरापासून ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा प्रमुख रस्ता, बळीराम चांदणे यांचे घरापासून ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंतचा प्रमुख रस्ता,बबन रेगुडे यांचे किराणा दुकान ते देवेंद्र ढाका ते शिंदे यांचे घरापर्यंतचा रस्ता, वीरशैव कॉलनी येथील दत्ता खडके यांचे घरापासून ते अशोक सम्राट बुद्ध विहारापर्यंत रस्ता, शंकर कांबळे यांच्या घरापासून ते पोलीस स्टेशन कंपाऊंड लगत ते गवंडर ते जगताप यांचे घरापर्यंत रस्ता,रमाई कॉलनी येथील हिरामण गायकवाड यांचे घरापासून ते कांबळे यांचे घरापर्यंत रस्त्याची कामे येत्या  आठ दिवसांत सुरु होणार

बीड (प्रतिनिधी) 18 डिसेंबर लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन ते चांदणी चौक पर्यंत चा प्रमुख रस्ता होत असुन यामुळे वाहतुकीस होणार अढथळा दुर होणार असल्याने पेठ भागातील  व्यापारी,ग्राहक,नागरिक समाधान व्यक्त करत असुन जयदत्त अण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषणजी क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांचे आभार मानत आहेत.आज नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी डॉ आंबेडकर पुतळ्या जवळील रस्त्याच्या कामाची पाहणी करत पाईप लाईन चे लीकेजस व्यवस्थित पणे काडून नुतन पाईपलाईन चे कामे दर्जेदार करण्याचा सूचना नगर पालिकेतील कर्मचाऱ्यानां दिल्या तसेच प्रभाग क्र 4 मधील रमाई कॉलनी,नागोबा गल्ली येथील महिला व पुरुष सार्वजनिक शौचालयाचे दुरुस्तीचे कामे सुरु असुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत नागोबा गल्ली येथील योगेश ताटे 

यांचे घरापासून ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा प्रमुख रस्ता, बळीराम चांदणे यांचे घरापासून ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंतचा प्रमुख रस्ता,बबन रेगुडे यांचे किराणा दुकान ते देवेंद्र ढाका ते शिंदे यांचे घरापर्यंतचा रस्ता, वीरशैव कॉलनी येथील दत्ता खडके यांचे घरापासून ते अशोक सम्राट बुद्ध विहारापर्यंत रस्ता, शंकर कांबळे यांच्या घरापासून ते पोलीस स्टेशन कंपाऊंड लगत ते गवंडर ते जगताप यांचे घरापर्यंत रस्ता,रमाई कॉलनी येथील हिरामण गायकवाड यांचे घरापासून ते कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता ही सर्व कामे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर,युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सततच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झाली असुन येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष या कामाला सुरवात होत असल्याचे नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी त्यांच्या समवेत अशोक कांबळे,अंकुश चव्हाण,मंगेश जोगदंड,सचिन जाधव,महादेव वंजारे,गोरख जोगदंड,किरण जोगदंड,दादाराव चांदणे सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा