Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत उत्साहात व शांततेत मतदान

बीड स्पीड न्यूज 


बीड, दि.21, (जि.मा.का.) – जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, केज व वडवणी या पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व पाच नगर पंचायतीच्या मतदानाची अंदाजित टक्केवारी आज दुपारी 3. 30 वाजेपर्यंत  70.03  टक्के झाली आहे.नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज सकाळी 7.30 वाजेपासून जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत विविध ठिकाणी उत्साहात व शांततेत 

मतदान सुरु झाले. आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, केज व वडवणी येथील मतदान केंद्रांवर 32 हजार 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.आज 16 हजार 688 पुरुष व 15 हजार 897 स्त्री मतदार यांनी असे एकूण 32 हजार 585 इतके मतदारांनी मतदान केले.सायंकाळी साडे तीन वाजेपर्यत प्राप्त झालेल्या 

आकडेवारी नुसार नगर पंचायत निवडणूकीत  आष्टी येथे 4 हजार  954 मतदारांनी मतदान केले असून पाटोदा येथे 7 हजार 121 , शिरुर कासार येथे 2 हजार  901, केज येथे 10 हजार  584 व वडवणी येथे 7 हजार  25 मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला.पाचही 

नगरपंचायत क्षेत्रात मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यत मतदान केले असून सर्व मतदार केंद्रात मतदान सुरु होते. अधिकृत अंतिम आकडेवारीस मतदान प्रक्रियेनुसार घोषित करण्यास उशीर लागत असून उपलब्ध होणे बाकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा