Subscribe Us

header ads

सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड मध्ये जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

बीड(प्रतिनिधी):- सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा, सावित्रीमाई यांच्या समतामूलक विचारांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि ते विचार आचरणात यावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड यांच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत गट: आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे विषय १) सावित्रीमाई फुले यांचे साहित्यिक योगदान.२) सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांचे आदर्श दांपत्य जीवन.३) स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले हे विषय असून या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५००, द्वितीय १०००, तृतीय पारितोषिक ७०० रुपये आहे. गट: पदवी ते पदव्युत्तर  चे विषय १) सावित्रीमाई फुले खऱ्या स्त्री-उद्धारक. २) महिला मुक्तीदात्या सावित्रीमाई फुले.३) सावित्रीमाई फुले यांचे साहित्य, समाज आणि सांस्कृतिक कर्तुत्व हे विषय असून प्रथम पारितोषिक २५००, द्वितीय १५००, तृतीय १००० असे आहे. विजयेत्यांचा सावित्रीमाई फुले करंडक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सदरील जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे सुरू होईल. स्पर्धेचा वेळ ५ ते ७ मिनिटांचा असेल, स्पर्धकाला स्वतः चे नाव सांगून मांडत असलेल्या विषयाची ओळख करून द्यावी लागेल, विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालय मार्फत स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयातून एक विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाईल, स्पर्धेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी हे असेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल असे आयोजकांनी सांगितले आहे. सदरील जिल्हास्तरीय वकृत्वस्पर्धा तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड यांनी आयोजित केली असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्रा.विद्या अवघडे,प्रा.पायल राठोड,प्रा.धनश्री सांगोले, प्रा.श्रद्धा डाके,प्रा.रसिका बाहेती, प्रा.प्रियंका बचुटे यांनी केले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोबाईल क्रमांक 9310666652 वर संपर्क साधून आपला प्रवेश नीच्छित करावा किंवा स्वतः तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड महाविद्यालयात येऊन संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा