Subscribe Us

header ads

नो हेल्मेट-नो पेट्रोल – डेप्यूटी आरटीओ जयंत चव्हाण

 बीड स्पीड न्यूज 

बीड, दि.23 (जिमाका):-  प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उप प्रादेशिक परिवहन अधकारी बीड यांच्या दि. 16.12.2021 रोजीच्या बैठकीत असे नमुद मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मधील तरतुदीनुसार दुचाक वाहन चालक व त्याच्या मागे बसुन प्रवास करणाऱ्या व्यकतीने संरक्षण शिरोवेष्टण (हेल्मेट) वापरणे बांधकारक आहे.प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी बैठकीत प्रतिपादन केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखानुसार संपूर्ण बीड जिल्ह्यातील मोटार सायकल यांची संख्या  2 लाख 40 हजार 959 आहे . जागतिक आरोग्य संघटना यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या वाहनाच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार भारतात जास्तीत जास्त अपघात हे मोटार सायकलने  होत असतात व त्यामध्ये मोटार सायकल चालक हे हेल्मेट न वापरल्या कारणाने त्यांचा मृत्यू होतो व गंभिररित्या जखमी होतात  मोटार सायकलच्या अपघातामध्ये तरुन मुले व मूली वय 18 ते 35 या वयोगटातील तरुन मुले नाहक प्राण गमावतात. बीड जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान दुचाकीच्या आपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या  178 आहे. त्यामुळे ही बाब नाकारता येत नाही. प्रस्तूत कायद्यातील तरतूदीनुसार दुचाकी वाहन चालक यांना बीड जिल्ह्यात मोटार सायकल चालवित आसतांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे व बीड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल  देण्यात येवू नये असे सुरक्षिततेच्या अनुषंगाने अधिसूचना करुन बीड जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालकांना महत्त्वपूर्ण सुचना  देण्यात याव्यात. त्यामुळे मोटार सायकलच्या अपघातांची संख्या बीड जिल्ह्यात कमी होतील. प्राधिकरणारे विषय सुचीचे अवलोकन केल व त्याची नोंद घेऊन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने  खालील निर्णय घेतले आहेत.बीड जिल्ह्यात नो हेल्मेट नो पेट्रोल चे धोरण राबविण्यात यावे व हेल्मेट परिधान केल्याशिवाय दुचाकीस्वारचा पेट्रोल / डिझेल/ एल.पी.जी गॅस देण्यात येऊ नये असे बीड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना देण्यात आले आहेत. हेल्मेट शिवाय दुचाकीस्वरांना पेट्रोलपंप परिसरात पुर्णपणे बंदी घालण्यात येईल. कुठल्याही परिस्थितील हेल्मेट नसलेले दुचाकीस्वर यांना पेट्रोल पंप परिसरात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक पेट्रोल पंप मालक चालक यांनी या  संबंधात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे आदेश ठळकपणे बॅनर लावून घ्यावे व पेट्रोल पंप परिसरात हेल्मेट शिवाय प्रवेश दिल्यास पेट्रोलियम नियम 2002 चे नियम 150 नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ कोचिंग क्लासेस सर्व पार्किंग ठिकाणी, एम. आय. डी.सी. परिसत, शासकीय कार्यालय (राज्य शासन व केंद्र शासन) महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर सर्व निमशासकीय कार्यालय मध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश बंदी घालण्यात येईल. पेट्रोल पंप मालक / चालक यांच्यावर सीसीटीव्ही बंधकारक राहील. तरी उपरोक्त नमुद परिसर मध्ये हेल्मेट शिवाय दुचाकीस्वार सापडल्यास संबंधित मालमत्ता अधिकारी (इस्टेट ऑफिसर) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब)(क) अन्वये कार्यावाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जयंत चव्हाण यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा