Subscribe Us

header ads

भाटसांगवी येथील पुरात वाहुन गेलेल्या पुलाचे काम कधी होणार!! गावकऱ्यांचा प्रशासन विरुद्ध संताप

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_ वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे सर्व पिके वाहुन गेली आहेत या झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागात खुप मोठे नुकसान झाले आहे. नदी ओढे ओसंडून वाहत होते त्यामुळे अनेक गावातील नदीवरचे पूल वाहून गेल्याने  गावांचा संपर्क तुटला होता यामध्ये बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील टुक्कडमोडी नदीवरचा पूल 30 ऑगस्ट रोजी रात्री वाहून गेला हा पुल वाहुन गेल्याने  या भागातील अनेक गावाचा संपर्क टुटला होता या भागातील राक्षसभुवन. कुक्कडगाव. चव्हाणवाडी. खुंड्रस .वडगाव. असे अनेक गावाला जोडणारा जाणारा हा पुल आहे. पुल वाहुन गेल्या नंतर काही दिवसाने आयुक्त केंद्रेकर साहेब 

आणि जिल्हाधिकारी साहेब  यांनी येऊन या पुलाची पाहणी केली पाहणी करून लवकरात लवकर पुल बनवण्याचे आदेश दिले परंतु तीन महिने उलटून गेले तरी या पुलाच्या कामाला सुरुवात देखील झालेली नाही या भागातील नागरिकांनी नदितील रोडा टाकून कशी बशी वाहतूक सुरू केली आहे. परंतु आयुक्तांनी सांगून देखील या पुलाचे काम का सुरु होत नाही? ग्रामीण भागातील विकास जाणुन बुजुन लवकर करत नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तरी या पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा