Subscribe Us

header ads

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फोडण्यात बीडच्या पाच जणांना अटक

बीड स्पीड न्यूज 

बीड_ आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. या प्रकरणामधील आरोपींची संख्या आता ११ वर पोचली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्‍टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे.लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे वय 50वर्ष, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड वय 36 वर्ष, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड, उद्धव प्रल्हाद नागरगोजे वय 36वर्ष, रा. तिंतरवणे, शिरूर कासार, बीड, शाम महादू म्हस्के वय 38वर्ष, रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड, राजेंद्र पांडुरंग सानप वय 51वर्ष, रा. शामनगर, बीड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. तर यापुर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली आहे.आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रारंभी मुऱ्हाडे, गायकवाड यांना, त्यानंतर मुंढे, जगताप, भुतेकर व मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सुत्रधार असण्याची दाट शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानेच अंबेजोगाई येथील मनोरूग्णालायातील डॉ.संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये व शाम म्हस्के याच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्‍नपत्रिका कोठून मिळविली, त्याला कोणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा