Subscribe Us

header ads

सफाई कामगार पदावरून कमी केल्याने अमरण उपोषण करणारी महिला चढून बसली लिंबाच्या झाडावर

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बीड नगर पालिका सफाई कामगार म्हणून कार्यरत असणार्‍या दोन महिलांना कामावरून कमी करण्यात आले होते. या महिला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासस बसल्या आहेत. महिलांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आज सकाळी यातील एक महिला समोरील लिंबाच्या झाडावर चढून बसल्याने पोलीस प्रशासनासह महसूल विभागाची चांगलीच धावपळ उडाली होती. महिलेस खालील उतरवण्यासाठी पोलीस प्रशासन धाव-पळत करत होते. मात्र जोपर्यंत कामावर घेण्याचा लेखी कागद दिला जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला होता. दुपारी दीड वाजता साईनाथ ठोंबरे यांच्या विनंतीवरून महिला 

झाडावरून खाली उतरली. उपजिल्हाधिकारी राऊत यांनी सदरील महिलेस लेखी आश्‍वासन दिले.अनिता बचुटे यासह अन्य एक महिलेस कामावरून कमी करण्यात आले. या महिला बीड नगर पालिके अंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. कामावर घ्यावे म्हणून रोजंदारी मजुर सेनेच्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आले, आंदोलन करण्यात आले मात्र याची दखल घेतली जात नसल्याने या महिला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. यामध्ये अनिता बचुटे, पंचशिला शिनगारे, राजकुमार जोगदंड, भाई गौतम आगळे यांचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांची दखल जिल्हा प्रशासन घेत
नसल्याने आज अनिता बचुटे ही महिला जिल्हाधिकारी 

कार्यालयासमोरील लिंबाच्या झााडावर चढून बसल्या. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून महिलेस खाली उतरण्याची विनंती केली. मात्र महिलेने प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आपल्या कशा पद्धतीने प्रशासन झळ करत आहे याची इत्यंभुत माहिती सांगितली. जोपर्यंत नियुक्तीचं लेखीपत्र दिलं जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलेने घेतला. जिल्हाधिकारी यांनीही कार्यालयातील दोन व्यक्तींना महिलेशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते.  मात्र महिला आपल्या मतावर ठाम होती. दीड वाजता शिवाजीनगर ठाण्याचे साईनाथ ठोंबरे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महिलेस खाली उतरण्याची विनंती केली, विनंतीनंतर महिला खाली उतरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा