Subscribe Us

header ads

जनप्रतिनिधी ने जनतेला दिलेले आश्वासन पाळता येत नसेल तर राजिनामे द्या--- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 
 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
बीड प्रतिनिधी_बीड आम आदमी पार्टीने सलग नऊ दिवस नाळवंडी नाका येथे आंदोलन करण्यात आले होते. या मध्ये  प्रमुख्याने मागणी पेठ बीड पोलीस स्टेशन ते नाळवंडी नाका व नाळवंडी नाका ते नाळवंडी या गावापर्यंत रास्ता करण्यासाठी सलग नऊ दिवस आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले त्यावेळेस 15 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला स्थानिक  आमदार संदीपजी शिरसागर व बीड नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी .मा कदम साहेब इंजिनीयर जाधव साहेब जिल्हा परिषदेचे अधिकारी जिल्हा परिषद नाळवंडी या भागातील जिल्हा परिषद सदस्य मा. घुमरे साहेब या भागातील नगरसेवक या सर्वांनी सर्व नागरिकांच्या उपस्थित यांच्या सर्वांच्या असे आश्वासन दिले होते की या रस्त्याचे काम आम्ही तातडीने मार्गी लावू परंतु आज चार 

ते पाच महिने उलटून गेले या रस्त्यावर ती साधा एक सिमेंटच टोपलं टाकण्याचे देखील काम झालेलं नाही एवढ्या लोकांनी एवढ्या अधिकाऱ्यांनी एवढ्या जण प्रतिनिधींनी आश्वासने देऊन जर कामे होत नसतील तर या भागातील किंवा या गावातील नागरिकांनी आपल्या सर्वांना कशासाठी निवडून दिले असेल असा प्रश्न आम जनतेच्या मनामध्ये पडत आहे आज या भागातली परिस्थिती पाहता या लोकांना जनप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्यांना या भागातील नागरिक यांविषयी एवढी उदासीनता का आहे हा सर्वात मोठा प्रश्न पडत आहे जर या प्रश्नाकडे वेळीच किंवा तात्काळ लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी मोठे जनआंदोलन उभा करून या भागातील प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम किंवा या भागातील जनरते चे प्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या जनप्रतिनिधी यांचे पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही आम आदमी पार्टीच्या या भांडाफोड संवाद दौर्‍यामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अक्रम, संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, शहर प्रमुख सय्यद सादेक, युवा नेते संतोष शिंदे छ***, रामभाऊ शेरकर, कैलाश चंद पालीवाल, बाळासाहेब घुमरे, रामधन जमाले इत्यादी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा