Subscribe Us

header ads

नेकनूर चॅम्पियन लीग (NCL)चा अंतिम विजेता ठरला जे.के इंडियन्स हायव्होल्टेज सामन्यात जे.के.इंडिअसकडून राजाभैय्या रॉयलासचा पराभव

बीड स्पीड न्यूज 

नेकनूर चॅम्पियन लीग (NCL)चा अंतिम विजेता ठरला जे.के इंडियन्स 

हायव्होल्टेज सामन्यात जे.के.इंडिअसकडून राजाभैय्या रॉयलासचा पराभव

नेकनूर/प्रतिनिधी_नेकनूर येथे नारायण बप्पा शिंदे मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मर्यादित शटकाच्या नेकनूर चॅम्पियन लीग (NCL)मध्ये दिवस रात्र सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते .यालीग मध्ये नेकनूर सर्कल मधील एकूण दहा संघांनी सहभाग  नोंदवला होता .प्रत्येक संघाने खूप चांगली कामगिरी दाखवली व प्रत्येक मॅच आहे अटीतटीचा झालेल्या पाह्यला मिळाला .परंतु सेमी फायनल मध्ये तीन संघ होते त्यापैकी अंतिम  सामना  जे के इंडियन व राजाभैय्या रॉयल यांच्यात झाला .हा सामना सुरू होण्या पूर्वी मान्यवरांच्या हस्ते टॉस केला गेला या मध्ये राजाभैय्या रॉयल चा कॅप्टन रतन निंगुळे व जे.के. इंडियन्स  चा कॅप्टन  आजीम  यांच्यात टॉस झाला  राजाभैय्या रॉयल्स ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .प्रथम फलंदाजी करत असताना जे के इंडियन्स कॅप्टन आजीम यांच्या रणनितीपुढे  राजाभैय्या रॉयल्स ने आठ शटकामध्ये 63 रन सर्व बाद अशी स्थिती केली त्या नंतर जे के इंडियन्स च्या संघाने  या सामन्याला आपण जिंकणारच म्हणत असताना जिंकण्यासाठी 64 रण चा पाठलाग करत असताना प्रथम शैलेश व रिझवान यांनी चांगली सुरवात केली परंतु रिझवान बाद झाल्यानंतर शैलेश ही बाद झाला त्यानंतर राशेद खेळण्यासाठी आला असताना पहिल्याच बॉलवर तो ही बाद झाला .त्यानंतर सोहिल व कॅप्टन अजीम यांनी आपल्या संघाला सावरत आजिम यांनी शेवटच्या बॉलवर चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आपल्या संघासाठी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळेे कॅप्टन आजीम व संपूर्ण जे के टीमचं  नेकनूर परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.नारायण बप्पा मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या (NCL )चे प्रथम पारितोषिक 71,000 रुपये  मुन्ना सेट फुटाणे यांच्या कडून  जे के इंडियन्स चा कॅप्टन अजीम यांच्याकडे देण्यात आला तर व्दितीय पारितोषिक 30,000 रुपये अमजद लारा हयात मेडिकल व आबेद कुरेशी यांच्या कडून राजाभैय्या रॉयल्स ला  देणायत आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा