Subscribe Us

header ads

लसीकरणापासून वंचित नागरिकांसाठी 1 ते 10 जानेवारी दरम्यानविशेष लसीकरण मोहीम राबवावी - जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा

बीड स्पीड न्यूज 

लसीकरणापासून वंचित नागरिकांसाठी 1 ते 10 जानेवारी दरम्यान

विशेष लसीकरण मोहीम राबवावी - जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा

 

          कोविड – 19 पूर्वतयारी व लसीकरण संदर्भात आढावा बैठकीत दिले निर्देश

 

बीड, दि. 28 (जि. मा. का.) :- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लसीकरणापासून वंचित नागरिकांसाठी 1 ते 10 जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आज येथे दिले.कोविड-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्व तयारी व लसीकरणा संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपायुक्त, विभागीय 

आयुक्त कार्यालय, औरंगाबाद श्री. बेदमुथा, अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई मनिषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व्यासपीठावर उपस्थित होते.राज्यात व औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले असून त्याचा प्रसार अतिशय वेगाने होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता संबधित सर्व यंत्रणांनी जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा म्हणाले, 100 टक्के लसीकरण पूर्ण करणे यावर संबंधित सर्व यंत्रणांनी भर द्यावा. त्यासाठी 1 ते 10 जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबवावी. नागरिकांनीही या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद द्यावा, 

असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविड चाचण्यांचे प्रमाण तात्काळ वाढविणे, एकूण चाचण्यांपैकी 70 टक्के आरटीपीसीआर चाचण्या होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले. लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेऊन तालुकानिहाय पथकाची नेमणूक करावी. या पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांचा समावेश करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे व लसीकरण मोहीम यशस्वी करुन आदर्श बीड पॅटर्न निर्माण करावा.उपायुक्त श्री. बेदमुथा म्हणाले, ओमायक्रॉन व्हेरिएंट चाचणीसाठी आवश्यक यंत्रणा जिल्हृयातच कार्यान्वित करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी प्रयत्न करावेत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून संबधित तालुक्यात चाचण्या व 

लसीकरणाचा वेग वाढवावा. ग्रामपंचायत निहाय लसीकरणचा आढावा घ्यावा. ऊसतोड, शिक्षण यासह अन्य कारणानिमित्त स्थलांतरित नागरिकांच्या लसीकरणाची नोंद व्हावी, यासाठी मतदार यादी निहाय सर्वेक्षण करावे. तसेच लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे की नाही याचीही नोंद घ्यावी, असे ते म्हणाले.यावेळी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व खाजगी आस्थापना या ठिकाणी कोविड 19- संदर्भातील चाचण्या व लसीकरण, कोविड 19- चाचणी प्रयोग शाळांची क्षमता वाढविणे, ऑक्सीजन व्यवस्थापन, बेड्सची उपलब्धता, मनुष्यबळ उपलब्धता आदिंचा आढावा घेण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा