Subscribe Us

header ads

ग्रामपंचायत व नगरपंचायत मतदानकेंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

बीड स्पीड न्यूज 


ग्रामपंचायत व नगरपंचायत मतदानकेंद्राच्या

परिसरात कलम 144 लागू

बीड, दि.14(जि.मा.का.):- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार आष्‍टी, पाटोदा, शिरुर (का.) केज व वडवणी या नगरपंचायतींमध्ये उर्वरित जागाचे सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच, जिल्ह्यात विविध कारणांवरुन रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीमधील  रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक 18.01.2022 रोजी मतदान व दि 19.01.2022 रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपाती व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या क्षेत्रात सीआरपीसी 144 (2) कलम लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध कारणांवरुन रिक्त झालेल्या ग्रामपंचायत जागांचे व आष्टी पाटोदा, शिरुर का. आणि वडवणी व केज या नगरपंचायत चे मतदानासाठी मतदान व मतमोजनी  केंद्राचे 200 मीटर परिसरात फौ. प्र.सं. 1973 चे कलम 144 (2) लागू करण्यात आले आहे.हा आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही, मतदार केंद्राच्या परिसरात नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांना वगळून पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतु जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे असतील त्यांना हे लागू  राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वापरास, वाद्य वाजविणे, मिरवणुका काढणे यावर प्रतिबंध राहील. शासकीय वाहनाव्यतिरिक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येईल, हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा