Subscribe Us

header ads

बीडमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात आ.संदिप क्षीरसागर,जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभसंभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात आ.संदिप क्षीरसागर,जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

बीड (प्रतिनिधी):- राज्यात वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासन अधिक सतर्क होत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या 

अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा रूग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा आ.संदिप क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी शर्मा यांनी आढावा घेतला.बीड जिल्हा रूग्णालय येथे 15 ते 18 या वयोगटातील मुलांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अनेकांनी लस घेतली असून मोठा प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून आले. बीड जिल्हा प्रशासनाने तात्काळ 50 केंद्र 

मुलांच्या लसीकरणासाठी उभारले आहेत. जिल्हा रूग्णालय येथील लसीकरण केंद्रावर शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ.राठोड, डॉ.ढाकणे, डॉ.आंधळकर, डॉ.शिंदे, मेट्रेन रमा गिरी यांच्यासह 

आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून 

परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. त्याचबरोबर वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या संदर्भात त्यांनी योग्य त्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा