Subscribe Us

header ads

फुले दाम्पत्य खरे भारतरत्न पुरस्काराची हकदार-बाजीराव धर्माधिकारी

बीड स्पीड न्यूज 


स्त्रियांच्या शिक्षणाचा उपयोग कुटुंब सुसंस्कृत बनवण्यासाठी झाला पाहिजे-प्रकाश सूर्यकर 

परळी /प्रतिनिधी_ ज्या फुले दांपत्य मुळे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले हेच खरे भारतरत्न पुरस्काराचे हक्कदार असून त्यांना हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे तर आज प्रत्येक स्त्री शिकत असली तरी त्या शिक्षणातून जोपर्यंत कुटुंब सुसंस्कृत बनत नाहीत तोपर्यंत फुले दाम्पत्यांचा स्त्रियांना शिक्षण देण्याचा लढा यशस्वी होणार नसल्याचे प्रतिपादन दैनिक दिव्यअग्नि चे संपादक प्रकाश सूर्यकर यांनी व्यक्त केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे परळी शहराध्यक्ष अमोल वंजे यांनी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुलींसाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक दिव्यअग्निचे संपादक 

प्रकाश सूर्यकर उपस्थित होते. यावेळी  मुख्यअतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे परळी तालुका अध्यक्ष सचिन बापू आरसुळे, नगरसेवक श्री गोविंद कुकर, श्री गणेश डाके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रांगोळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावता माळी परिसर ,सिद्धेश्वर नगर व इतर परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोविंद लोखंडे सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू बने, शिद्धेवर गावडे, गोविंद लोखंडे, गणेश डाके, कृष्णा शिंदे, राहुल वंजे, हनुमान गायवाळ, महादेव जाधव, मनोज गावडे, अमर सुरवसे, नागेश सौन्दळे, मेहबूब खान, ज्ञानेश्वर राऊत, गोपाळ सातपुते, दत्ता शिंदे, शंकर लोखंडे, अशोक डाके, प्रतीक डाके, जय सातपुते, दशरत घोलप, भगवान तळेकर, वैजनाथ सौन्दळे, बाळासाहेब चिंचाणे, मंचक कटारे,आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा