Subscribe Us

header ads

समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढाई चालूच राहील-- नवाब मलिक

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. मात्र, वानखेडे यांची बदली झाली तरी  त्यांच्याविरोधातील लढाई थांबणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. समीर वानखेडे यांचा फर्जीवाडा मी उघड केला होता. त्यांना मुदतवाढ मिळाली नाही हे चांगलं झालं. मी या प्रकरणात पाठपुरावा करणार आहे. त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून काही लोक प्रयत्न करत होते. जर त्यांना ही मुदतवाढ मिळाली असती तर त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मी एक्सपोज केलं असतं, असं मलिक यांनी सांगितलं. मात्र, आता वानखेडे यांना मुदतवाढ न मिळाल्याने त्यांच्यासाठी लॉबिंग करणाऱ्यांची नावे सांगणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वानखेडेंची बदली झाली असली तरी त्यांच्याविरोधातील लढाई सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली आहे. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा