Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नातून 25 गावच्या पाणी पुरवठ्यासाठी 17 कोटी रूपयांचा निधी

बीड स्पीड न्यूज 

आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नातून 25 गावच्या 
पाणी पुरवठ्यासाठी 17 कोटी रूपयांचा निधी



बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे माध्यमातून बीड तालुक्यातील 25 गावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 17 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या 25 गावचा पाणी प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी मिटणार असून पहिल्या टप्प्यात बीड तालुक्यातील 25 गावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.बीड तालुक्यामध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील 25 गावच्या पाणी पुरवठा योजनेस पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची उपस्थिती होती. या योजनेमध्ये बीड तालुक्यात 25 गावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये शहाजानपूर/कामखेडा, लिंबारूई देवी, पाटोदा बेलखंडी, ढेकणमोहा, उमरद खालसा, उमरद जहाँगीर, काळेगाव हवेली, तळेगाव, वाढवणा, गुंधा, लिंबागणेश, रूईलिंबा, बोरखेड, बाभुळखुंटा, माळापुरी, डोईफोडवाडी, महाजनवाडी, केतुरा, कुमशी, हिंगणी/पारगाव जप्ती, नांदुर हवेली, चव्हाणवाडी, खामगाव, रंजेगाव, कुर्ला आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा