Subscribe Us

header ads

भारत देशाचे पहिले थोर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडवणीस यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा -टिपू सुलतान जयंती उत्सव समिती माजलगाव

बीड स्पीड न्यूज 

भारत देशाचे पहिले थोर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या  देवेंद्र फडवणीस यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा -टिपू सुलतान जयंती उत्सव समिती माजलगाव


माजलगाव (प्रतिनिधी):- माजलगाव शहरातील टिपू सुलतान जयंती उत्सव समितीच्या वतीन आंबेडकर चौकात  देवेंद्र फडवणीस याच्या विरुद्ध कडक कारवाई करा असे निषेध करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की भारत देशाचे पहिले थोर स्वतंत्र सेनानी, पहिले मिसाईलमॅन इंग्रजांचे कर्दनकाळ , महान शासक , लोकहितवादी , लोककल्याणकारी न्यायप्रिय सर्व समावेषक राजा महान स्वतंत्र सेनानी तसेच भारत देशासाठी इंग्रजांविरूध्द लढतांना शहीद होणारे अखंड भारताच्या प्रेरणा स्त्रोत आणि अभिमान आहे, अशा भारत मातेच्या वीर पुत्र टीपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक व द्वेषपूर्वक विधान करून राज्यातील शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे देवेंद्र फडवणीस यांच्यावर योग्य अशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. 
 मोहसीन पटेल, मुज्जमील पटेल, शेख इद्रीस पाशा, हाफेज फारूख, मौलाना फारूख, सय्यद राजू, राजू भाई कुरेशी, सज्जाद राज, फारूख आण्णा, अरबाज मिर्झा, समीर आत्तार, राजू पठाण, बबलू सिध्दीकी, शेख अखिल, सोहेल आत्तार, सुमेर सिध्दीकी, सय्यद आवेज, अलिम शेख,असा इशारा टिपू सुलतान जयंती उत्सव  समिती यांच्या वतीने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा