Subscribe Us

header ads

सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांची चंदन तस्कर अड्ड्यावर धाड 328 किलो चंदन जप्त 17 जण ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांची चंदन तस्कर अड्ड्यावर धाड 328 किलो चंदन जप्त 17 जण ताब्यात


बीड_गेवराई तालुक्यातील चंदन चोरांच्या अड्यावर आज पहाटे पोलिसांनी धाड टाकून सतरा चंदन चोरांना ताब्यात घेतले. यावेळी तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत 328 किलो चंदन  बाईक आदी तब्बल 9 लाख 38 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा आपल्या साथीदारांसह परिसरातील चंदनाची झाडे चोरून स्वतःच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा गाभा काढून विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुरुवारी मिळाली. यानंतर पलिस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, सपोनि संतोष मिसळे, सहायक पोलिस शफी इनामदार, पोहेका बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे महादेव सातपुते, संजय टूले यांच्या पथकाने आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मोरवड येथील चंदन चोरांच्या अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांनी सतरा चंदन चोरांना जागीच पकडले तर तिघेजण पळून गेले.पोलिसांनी येथून 7 लाख 87 हजार रुपये किंमतीचा 328 किलो चंदन 4 बाईक असा एकूण 9 लाख 38 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरून चकलंबा पोलिस ठाण्यात 20 चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा