Subscribe Us

header ads

ओबीसी आरक्षणातील अन्याय दूर करण्याकरिता आर्थिक मदतीची गरज !संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मदतीसाठी पुढे येणे आवश्यक - एस.एम.युसूफ़

बीड स्पीड न्यूज 

ओबीसी आरक्षणातील अन्याय दूर करण्याकरिता आर्थिक मदतीची गरज !
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मदतीसाठी पुढे येणे आवश्यक - एस.एम.युसूफ़

बीड (प्रतिनिधी) - सन १९९४ पासून ओबीसी आरक्षणातून होत असलेला अन्याय दूर करण्याकरिता कवठेकर मामांनी सुरू केलेल्या आंदोलनाला न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सजग, दक्ष, जागरूक व दानशूर लोकांनी पुढे येऊन या आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील मराठा, मुस्लिम, जैन, माहेश्वरी, ब्राह्मण, लिंगायत, मारवाडी आदी समाजाच्या नागरिकांना न्याय मिळावा याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यासाठी पुढे यावे. असे कळकळीचे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, ओबीसी आरक्षण दुरुस्तीची याचिका दाखल करण्यासाठी २२ लक्ष रूपयांची गरज आहे. सन १९९४ पासून लागू करण्यात आलेले ओबीसी आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचे कवठेकर मामांनी पुर्ण अभ्यास करून आकडेवारीसह समाजासमोर आणले आहे. १९९४ मध्ये काँग्रेसचे शरद पवार सरकार असताना त्यात मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी गनिमी कावा करत धोक्याने ओबीसी ची संख्या मोठ्या प्रमाणात फुगवून सांगत चुकीच्या पद्धतीने तत्कालीन सरकारसह जनतेच्या डोक्यात आणि डोळ्यातही धूळफेक करत सदरील आरक्षण लागू केलेले आहे. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या आरक्षण वाटपातील दुरुस्ती करण्याकरिता आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करावयाची आहे. यासाठी कवठेकर मामांनी २२ लक्ष रुपये लागणार असल्याची माहिती या अगोदर प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहीर केलीच आहे. नागरिकांनो, हे बेकायदेशीर आरक्षण दुरुस्त झाल्यास ओबीसींना दिलेल्या ३२ टक्के आरक्षणापैकी २७ ते २८ टक्के कोटा खुला होऊ शकतो. ज्याचा लाभ राज्यातील साडेआठ कोटी जनतेला होऊ शकतो. तरी खुल्या वर्गातील संपूर्ण महाराष्ट्रातील सजग, दक्ष, जागरूक व दानशूर नागरिकांनी या लढ्याचे  महत्त्व ओळखून कवठेकर मामाच्या बँक व फोनच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी आणि आरक्षणाच्या या लढ्यात खारीचा का होईना वाटा उचलावा. असे कळकळीचे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केले असून आर्थिक मदत जमा करण्यासाठी त्यांनी कवठेकर मामाच्या एसबीआय खाते क्रमांक - ३० ८९ ७७ १९ ४४१, आय.एफ.एस.सी.कोड एस.बी.आय.क्र.०२००२८ व पेटीएम साठी ९० ४९० १३७५१ हा फोन क्रमांक ही दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा