Subscribe Us

header ads

600 गरजुंना मोफत स्वेटर वाटप गुरु आनंद महिला प्रतिष्ठान,प्रयास फउंडेशनचा उपक्रम

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी_दि.6 ः समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात गुरु आनंद महिला प्रतिष्ठान नेहमी पुढे असते. गुरुवारी (दि.6) गुरु आनंद महिला प्रतिष्ठान, बीड व प्रयास फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने सिरसमार्ग येथील समर्थ विद्यालयात 600 गरजुंना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या सिमा मनोज ओस्तवाल, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गंगाधर काळकुटे, भागवत तावरे, केशव कदम, भारत तांबारे, सुभाष पवळ, सरपंच अशोक परदेशी, विरेंद्र ओस्तवाल, रोहित लंबे आदींची उपस्थिती होती.सर्वप्रथम सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिमा ओस्तवाल या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्यावतीने नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. दिवाळीला किराणा वाटप, चटई वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप त्याच बरोबर मुलींनी आपल्या पायावर उभं राहावे म्हणून ब्युटी पार्लरसह इतर कोर्सचे मोफत प्रशिक्षणही देत आहेत. गुरुवारी सिरसमार्ग येथील 600 गरजुंना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शिवाजीनगरचे राष्ट्रवादी विधनसभा उपाध्यक्ष विरेंद्र ओस्तवाल यांनी केले. त्यानंतर बोलताना गंगाधर काळकुटे म्हणाले की, ओस्तवाल परिवाराकडून नेहमी चांगले उपक्रम राबवले जातात. त्यांच्या या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होवून हातभार लावण्याची गरज आहे. त्यांच्या या कार्याचा यज्ञ असाच पुढेही चालत राहावा अशा शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मल्हार गडकर, शुभम बलकवडे, संचार उमाप यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोरोना नियमाचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला. तर कार्यक्रमाचे बहरदार सुत्रसंचालन शरद मगर यांनी केले.

 

संकल्प दर्शनाजी यांच्याकडून
सिमा ओस्तवाल यांचे कौतूक


या कार्यक्रमासाठी विचक्षणाजी मा.सा.श्री संकल्प दर्शनाजी मा.सा (जैन गुरू) यांची उपस्थिती होती. गोरगरीबांसाठी सिमा ओस्तवाल राबवत असलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंडभरुन कौतूक केले. तसेच गुरु आनंद महिला प्रतिष्ठान चांगले काम करत आहे, त्यांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सिरसमार्गच्या सुनेने लेकीची
जागा घेतली-भागवत तावरे

एकदा गाव सोडले की, कोणताही भूमीपुत्र गावाकडे वळून पाहत नाही. पण सिमा ओस्तवाल या सिरसमार्गच्या सुन असताना त्यांनी लेकीची जागा घेतली आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, गोरगरीबांसाठी दिवाळीला किराणा तर थंडीमुळे गरजुंना मोफत स्वेटर. एवढ्यावर त्या थांबल्यानसून मुलींना आपल्या पायावर उभं राहता यावं म्हणून हजारो रुपये खर्चून मिळणारे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण त्या शहरात मोफत देत आहेत. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतूक कमी असल्याचे पत्रकार भागवत तावरे यांनी बोलताना सांगितले.


मुलींना स्वतःच्या पायावर उभं
करण्यासाठी प्रयत्न-ओस्तवाल


बीड जिल्हाभरात चांगले समाजोपयोगी काम करण्यासारखे आहे. परंतु गोरगरीबांना मदतीसाठी बीडमधून मदत मिळत नाही, ही शोकांतिका असून जिल्ह्याच्या बाहेरील दानशुर व्यक्ती, संस्थांकडून मदत मिळते. बीडमधील दानशुर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. यापुढे या कामाची व्याप्ती आणखी वाढणार असून मुलींनी स्वतःच्या पायावर उभं  राहावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिमा ओस्तवाल यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा