Subscribe Us

header ads

ब्रीज कम के टी.वेअर बंधार्‍याचे काम तात्काळ सुरू करा; अन्यथा काम बंद पाडणार16 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन- राजेभाऊ फड, श्रीराम मुंडे

बीड स्पीड न्यूज 

ब्रीज कम के टी.वेअर बंधार्‍याचे काम तात्काळ सुरू करा; अन्यथा काम बंद पाडणार 16 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन- राजेभाऊ फड, श्रीराम मुंडे

परळी (प्रतिनिधी): परळी ते पिंपळा धायगुडा (अंबाजोगाई) राष्ट्रीय महामार्गाच्या चालु असलेल्या कामामध्ये कन्हेरवाडी नदीवरील पुलाखाली ब्रीज कम के.टी.वेअर (बंधारा)  तात्काळ सुरू करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने 16 जानेवारी पासुन रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावचे सरपंच राजेभाऊ फड, सोसायटीचे चेअरमन श्रीराम मुंडे यांच्यासह आदींनी दिला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या संकल्पेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात योग्य त्या ठिकाणी ब्रीज कम के.टी.वेअर (बंधारा) करण्याचे निर्णय असुन या निर्णयास पात्र असलेल्या परळी तालुक्यातील मौजे कन्हेवाडीची नदी असुन त्या नदीवर पुलाचे काम चालु आहे तो पुल ब्रीज कम के टी वेअर (बंधारा) करण्यात आल्यास कन्हेरवाडीचा पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न सुटेल, यासह या हा मार्ग परळीतुन जाणार्‍या मार्गापैकी एक मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गावरून दिंड्या वारकर्‍यांच्या स्नानाची सोय होईल. यामुळे भाविक भक्तांना त्रास होणार नाही. या प्रश्‍नासाठी यापुर्वी गावकर्‍यांच्या वतीने दि.07/09/2021 रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यावेळी आपल्या विभागाच्या अधिकार्‍यांननी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची कुठलीही पुर्तता केली नाही. त्याचे अजुन पर्यंत अंदाजपत्रक सुध्दा बनवले नाही त्याची मंजुरी केली नाही म्हणुन कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने येत्या पंधरा दिवसामध्ये नदीवर ब्रीज कम के टी वेअर (बंधारा) कामाला मंजुरी देऊन तात्काळ काम सुरू करण्यात यावे. काम जर पंधरा दिवसामध्ये सुरू न झाल्यास येत्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता काम बंद पाडुन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच राजेभाऊ फड, सोसा.चेअरमन श्रीराम मुंडे यांच्यासह यशवंत मुंडे, अरूण मुंडे, मधुकर गणपतराव मुंडे, दत्ता मुंडे, शंकर फड, बालाजी फड, ज्ञानोबा गित्ते, शिवाजी फड, विजयकुमार फड, कोंडीबा फड, श्रीराम फड, नारायण फड, संतोष फड, नामदेव खांडे, वसंत मुंडे, प्रल्हाद मुंडे, महादेव मुंडे, बबन गिरी, बाबासाहेब फड, सुर्यकांत मुंडे, भगवान फड, रामदास रोडे, नवनाथ फड, केरबा गवळी, पांडुरंग मुंडे, विष्णु फड, किसन फड, महादेव फड यांनी दिला  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा