Subscribe Us

header ads

आरोग्य विभाग गट क पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई ;आणखी एका शिक्षकाला अटक

बीड स्पीड न्यूज 

पुणे_दि.6जानेवारी :-आरोग्य गट क पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली आहे. पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला शाळेतूनच ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या शिक्षकाचे नाव (उद्धव प्रल्हाद नागरगोजे) असे आहे. पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे आला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचं पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते. शिरूर तालुक्यातील तितरवणीतून शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजेला अटक झाली.बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंक बडगीर, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. वेगवेगळे अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात यांचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा